एक लिटर पेट्रोल आणि डिझेल मागे पंप चालक किती कमाई करतात..? |Petrol Pump
भारतात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढतच आहे. भारतातील वाहने ही प्रामुख्याने पेट्रोल आणि डिझेलवर चालणारी आहेत .तसेच यांची संख्या देखील खूप आहे. अलीकडील काळात पेट्रोल आणि डिझेल ला पर्याय म्हणून सीएनजी तसेच EV इलेक्ट्रिकल व्हेईकल तयार करण्याचे प्रमाण वाढत आहे .पण मुख्यतः आपल्या देशातील वाहने ही पेट्रोल आणि डिझेलवरच चालणारी आहेत. पेट्रोल आणि डिझेल साठी प्रत्येकाला पेट्रोल पंपावर जावंच लागते. तिथे गेल्यावर अनेकांच्या मनात एक प्रश्न कायम येत असतो की पेट्रोल पंप च्या माध्यमातून पेट्रोल पंप मालक दिवसाला किती कमाई करत असतील....? अनेकांना असं वाटतं असेल की पेट्रोल पंप म्हणजे यातून खूप कमावत असणार..! पेट्रोल पंप म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे ..वैगेरें ... पण वस्तुस्थिती खूप वेगळी असते. ज्याप्रमाणे इतर व्यवसायामध्ये फायदा, नुकसान तसेच धोका आहे त्याचप्रमाणे या व्यवसायात सुद्धा फायदा, नुकसान तसेच धोका सुद्धा आहे.येथून होणारे आर्थिक उत्पन्न हे पेट्रोल आणि डिझेलचे मागणी आणि कामकाजावर अवलंबून असते.. तर MH बारा या ब्लॉगवर आज आपण एक लिटर पेट्रोल आणि डिझेल मागे पंप चालक किती कमाई करतो हे जाणून घेऊयात...
प्रत्येकी एक लिटर पेट्रोल किंवा एक लिटर डिझेलवर पेट्रोल पंप मालकाला ठराविक कमिशन मिळत असते.कमिशन दर तेल कंपनी आणि केंद्र सरकारच्या धोरणानुसार वेळोवेळी बदलतात .
निव्वळ नफा हा पूर्णतः व्यवसाय व्यवस्थापन, स्थान, खर्च नियंत्रण आणि टर्नओव्हरवर अवलंबून असतो.
महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल ची किंमत ही वेगवेगळे असते.एक ली पेट्रोल विकून पंप चालकाला सरासरी 3 रुपये ते 3.5 प्रति लिटर इतकी कमिशन मिळतात. कमिशनचा स्लॅब इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ,हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, रिलायन्स पेट्रोलियम यासारखे कंपन्याकडून ठरवले जातात.
मासिक कमाईचे अनुमान (महाराष्ट्रातील एका व्यावहारिक उदाहरणावरून):
1. जर एक पंप दररोज 10,000 लिटर पेट्रोल विकत असेल:
दररोज कमिशन = 10,000 × ₹3.5 ≈ ₹35,000
महिन्याला (30 दिवस) = ₹35,000 × 30 = ₹10.5 लाख
(या मध्ये ऑपरेशन खर्च, स्टाफ,वीज, जमीन भाडे किंवा लीज आणि कर्जाचा समावेश नाही.)
पेट्रोल पेक्षा डिझेलवर कमिशन कमी असते. कारण डिझेलचा फेस रेट कमी असतो. यावर टॅक्स देखील पेट्रोलच्या तुलनेने कमी असते.
महाराष्ट्रात पेट्रोल पंप मालकांची कमाई साधारण ₹3–₹4 प्रति लिटर दराने होते. पण हातात मिळणारा एकूण नफा हा अनेक प्रकारच्या खर्च असल्याने निव्वळ नफा खूप घटतो, त्यामुळे फक्त पंपावर अवलंबून न राहता इतर services चालवून तो सक्षम व्यवसाय होतो. सगळे खर्च बाजूला काढल्यानंतर एक रुपया ते दीड रुपये प्रति लिटर पर्यंत पेट्रोल पंप कमवू शकतात. जर पेट्रोल आणि डिझेल ची एका दिवसाची विक्री जास्त असेल तर मिळणार नफा हा कमी कालावधीत जास्त मिळू शकतो .
याशिवाय पेट्रोल पंपावर उत्पन्नाचे इतर अनेक पर्याय उपलब्ध असतात जसे की- पेट्रोल पंपावर मिनी स्टोअर उघडणे , पंक्चर काढणे, ऑइल 🛢️ आणि लुब्रिकंट्स विकणे तसेच तेल कंपन्याकडून बोनस देखील मिळत असतो .त्यामुळे त्यांचे उत्पन्नात भर पडते हे फक्त एक ढोबळ कल्पना आहे. प्रत्यक्ष उत्पन्न पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीच्या प्रमाणात अवलंबून असते. इंधनाचे विक्रीचे प्रमाण आणि अतिरिक्त सर्विसेस मधून पेट्रोल पंप मार्गाचे उत्पन्न वाढू शकते...
इतर पोस्टस वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
0 Comments