तुम्ही मोबाईल मध्ये Dark Mode वापरता ना...?
आजकाल सर्व मोबाइल आणि त्यामधले प्रत्येक अॅप्स,Computer /Laptop , वेबसाईट्स आणि ऑपरेटिंग सिस्टिममध्ये Dark Mode किंवा Night Mode (गडद पार्श्वभूमी) हा पर्याय दिलेला असतो . यामध्ये पार्श्वभूमी (Background) काळसर असते आणि अक्षरं पांढऱ्या रंगात असतात. हे केवळ सौंदर्यदृष्टिकोनातून नाही, तर डोळ्यांचे आरोग्य आणि बॅटरी वाचवण्यासाठीही खूप फायदेशीर आहे.तर MH १ २ या ब्लॉग वर मोबाईल मध्ये Dark Mode वापराचे फायदे जाणून घेऊ ..
![]() |
तुम्ही मोबाईल मध्ये Dark Mode वापरता ना...? |
Dark Mode किंवा Night Mode म्हणजे काय?
गडद मोड म्हणजे असा डिस्प्ले मोड, ज्यात स्क्रीनचा रंग गडद (सहसा काळा किंवा राखाडी) असतो आणि मजकूर (text) हलक्या रंगात (पांढरा, पिवळा किंवा हलका राखाडी) दिसतो. हा दिवस दिसणाऱ्या डिस्प्लेच्या अगदी उलट आहे, जिथे पांढरी पार्श्वभूमी आणि काळा मजकूर असतो. गडद मोडला नाईट मोड किंवा ब्लॅक मोड असेही म्हणतात.
Dark Mode किंवा Night Mode चे फायदे ...
१. डोळ्यांवरील ताण कमी होतो
२. बॅटरी वाचते:
AMOLED/ OLED (Organic Light-Emitting Diode) स्क्रीन असलेल्या मोबाइलमध्ये डार्क पिक्सेल कमी ऊर्जा वापरतात, त्यामुळे मोबाइल बॅटरीचा वापर कमी होतो.
३. सतत मोबाईल वापरणाऱ्यांसाठी उपयोगी:
डार्क मोडमुळे दीर्घकाळ मोबाइल वापरला तरी डोळ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाही .
४. झोपेवर परिणाम होत नाही:
डार्क मोड वापरल्यास प्रकाश कमी पडतो, ज्यामुळे झोपेवर होणारा परिणाम टळतो.जो मेलॅटोनिन (झोप नियंत्रित करणारा हार्मोन) कमी करतो.
५. मोबाइलचा स्मार्ट वापर:
डार्क मोड हे एक स्मार्ट, पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी तंत्रज्ञानाचे उदाहरण आहे
६. वाचायला सोपे:
काही लोकांना गडद पार्श्वभूमीवर मजकूर वाचायला अधिक सोपे वाटते. यामुळे वाचनाचा अनुभव सुधारतो, विशेषतः रात्रीच्या वेळी..
गडद मोड कुणासाठी जास्त उपयुक्त आहे?
१ . रात्री मोबाइल वापरणाऱ्यांसाठी:२ . दीर्घकाळ स्क्रीनसमोर काम करणाऱ्यांसाठी:
३ . डिजिटल आर्टिस्ट आणि डिझाइनर्ससाठी:
डार्क मोड कसा चालू करायचा?
अनेक ॲप्स आणि ऑपरेटिंग सिस्टिम्समध्ये गडद मोड चालू करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या मोबाइलच्या सेटिंग्समध्ये जाऊन डिस्प्ले किंवा थीम पर्यायामध्ये हा मोड चालू करू शकता.
गडद मोड हा एक सोपा पण खूप प्रभावी उपाय आहे, जो तुमच्या डोळ्यांचे आरोग्य जपतो आणि तुमच्या डिव्हाइसची बॅटरी सुद्धा वाचवतो.
RELATED POST :
0 Comments