ENG vs IND : रवींद्र जडेजाची एकाकी झुंज अपयशी, इंग्लंडचा लॉर्ड्समध्ये 22 धावांनी विजय । भारताचा निसटता पराभव
England vs India 3rd Test Match Lords Result : बर्मिंगहॅममध्ये टीम इंडियाने इंग्लंडवर मात करत मालिकेत बरोबरी साधली होती. त्यामुळे टीम इंडियाकडे लॉर्ड्समध्ये विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याची उत्तम संधी होती. मात्र भारताला त्यात अगदी थोडक्यात अपयश आलं.तर MH १ २ या ब्लॉग वर याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ ..
पहिला डाव बरोबरीत
इंग्लंडने टॉस जिंकून पहिल्या डावात जो रुट याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर सर्व बाद 387 रन्स केल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही केएल राहुलच्या दमदार शतकाच्या मदतीने इंग्लंड इतक्याच म्हणजेच 387 धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 1 ओव्हरमध्ये 2 धावा केल्या. इंग्लंडच्या सलामी जोडीने वेळकाढूपणा केल्याने या शेवटच्या ओव्हरमध्ये फुल राडा पाहायला मिळाला. कर्णधार शुबमन गिल आणि टीम इंडियाच्या खेळाडूंनी इंग्लंडच्या सलामी जोडीला चांगलंच सुनावलं. त्यामुळे चौथ्या दिवशी काय होतं? याची उत्सुकता शिगेला पोहचली होती .
रवींद्र जडेजा इंग्लंड गोलंदाजांना नाकी नऊ आणलं :
![]() |
England vs India 3rd Test Match Lords Result |
इंग्लंडने टीम इंडियासमोर फक्त 193 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले. केएल राहुल याच्यानंतर रवींद्र जडेजाने इंग्लंड च्या गोलंदाजांना भारी पडला . अखेरच्या क्षणी नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या तिघांनीही रवींद्र जडेजाला चांगली साथ दिली. मात्र टीम इंडिया विजयी धावांपर्यंत पोहचण्यात अपयशी ठरली. इंग्लंडने भारताला दुसऱ्या डावात 74.5 ओव्हरमध्ये 170 धावांवर सर्व बाद केलं आणि 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडी घेतली आहे.
इंग्लंडने ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये तिसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. इंग्लंडने सामन्यातील पाचव्या दिवशी 14 जुलैला टीम इंडियावर 22 धावांनी मात केली आहे. इंग्लंडने यासह या मालिकेतील दुसरा विजय मिळवला आहे.
Post a Comment