PM Kisan and Namo Samman New Rules : पीएम किसान, नमो सन्मानसाठी नवी नियमावली; कसे आहेत बदल, जाणून घ्या
![]() |
Pm Kisan Yojana: तुम्ही 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमीन खरेदी केली आहे का? तर मग ‘हे’ वाचा |
Pm Kisan Yojana:-
कृषी क्षेत्रासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही अतिशय महत्त्वाची योजना असून या योजनेच्या माध्यमातून वर्षाला ६००० हजार रुपयांची मदत तीन टप्प्यात विभागून शेतकऱ्यांना देण्यात येते व केंद्र शासनाने २०१९ मध्ये शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजना सुरू केली. तसेच आता महाराष्ट्र शासनानेही नमो सन्मान योजना लागू केली असून राज्य शासनाकडूनही राज्यातील शेतकऱ्यांना वर्षातून तीन हप्त्यात सहा हजार रुपये मिळत आहेत...
साहजिकच कुठलीही योजना राबवताना त्यासंबंधीचे पात्रतेचे निकष व काही अटी पूर्ण करणे गरजेचे असते व असेच नियम व अटी या दोन्ही योजनांच्या बाबतीत सरकारने लागू केलेले आहेत. या नियमांमुळे काही विशिष्ट कालावधी दरम्यान जमीन खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच लाभ दिला जातो. त्यामुळे या योजनांच्या बाबतीत जमीन खरेदीचा नियम काय आहे आणि कुणाला लाभ मिळू शकतो? व इतर काही अटी याबद्दलची माहिती MH बारा या ब्लॉगवर थोडक्यात बघू.
नुकतेच जमीन खरेदी केली असेल तर..?
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना PM Kissan 2019 मध्ये सुरू करण्यात आली व आतापर्यंत या योजनेच्या 19 हप्त्यांचे वितरण करण्यात आलेले आहे. लवकरच शेतकऱ्यांना आता या योजनेचा विसावा हप्ता मिळण्याची शक्यता आहे...
सूत्रानुसार PM Kisaan 20 वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 ला मिळण्याची शक्यता आहे.पंतप्रधान किसान सन्मान निधी च्या अटी नुसार ज्या शेतकऱ्यांनी 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमिनीची खरेदी केली आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
परंतु फक्त आणि फक्त वारसा हक्काने मिळालेली जमीन वरच PM किसान योजना लाभ घेता येतो.. खरेदीच्या आधारे मिळालेली जमीन या योजनेसाठी पात्र ठरत नाही. त्यामुळे नवीन अर्ज करणाऱ्यांनी जमीन खरेदीची ही अट लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. तसेच काही महत्त्वाच्या अटी जर बघितल्या तर नवीन नोंदणी करताना आता पती तसेच पत्नी आणि अठरा वर्षावरील मुलांचे आधारकार्ड देखील जोडणे बंधनकारक आहे. कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनांचा लाभ मिळतो.
वारसा हक्कावर आधारित नोंदणी असेल तर
समजा एखादा पात्र लाभार्थ्याचा मृत्यू झाला असेल व त्या व्यक्तीच्या नावावरील जी काही जमीन आहे ती वारसा हक्काने दुसऱ्या व्यक्तीकडे गेली असेल तर त्या व्यक्तीला( पती किंवा पत्नी पैकी एकाला) या योजनेचा लाभ मिळतो. परंतु संबंधित व्यक्ती कुठल्याही प्रकारचे सरकारी किंवा निम सरकारी नोकरीत नसावी व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजेशासनाचे कर भरणाऱ्या यादीत त्यांची नोंद देखील नसावी.
इतर posts वाचण्यासाठी येथे क्लिक करा: दूध आरोग्यासाठी हवेच, पण कोणते...? गायीचे की म्हशीचे?
या योजनेसाठी कोण कोण अपात्र ठरतात..?
या योजनेसाठी 2019 नंतर जमिनीची खरेदी केलेले शेतकरी, संस्थात्मक जमिनीची मालकी असलेले जमीनधारक, तुम्हीही किंवा जमीन स्वतःच्या नावावर नसलेले शेतकरी, जमिनीचा वापर इतर शेती व्यतिरिक्त कारणांसाठी करणारे, ज्यांच्या कुटुंबातील प्रमुखाला आधीच या योजनेचा लाभ मिळाला आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सरकारी किंवा निमसरकारी नोकरी करणारे व आयकर भरणारे व्यक्ती या योजनेसाठी अपात्र ठरतात.
नवीन नोंदणी करता येते का..?
नवीन नोंदणी करता येते का? तर याचे उत्तर आहे ' हो ' फक्त एक अट आहे ती म्हणजे पात्र लाभार्थ्याचा मृत्यू झाला असेल व त्या व्यक्तीच्या नावावरील जी काही जमीन आहे ती वारसा हक्काने दुसऱ्या व्यक्तीकडे गेली असेल तरच त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळतो.
Post a Comment