पी एम किसान 20 वा हप्ता या दिवशी भेटण्याची शक्यता । PM Kisan Samman Nidhi Yojana 20th Installment Release Date
पी एम किसान च्या विसाव्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा खूप दिवसापासून आहे ...साधारणत जून पासून शेतकरी पीएम किसान च्या विसाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत..२० व्या हप्ता याबाबतची एक शक्यता समोर आली आहे.. ती म्हणजे , 9 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून परत येत आहेत. यानंतर ते विसावा हप्ता जाहीर करू शकतात अशी अपेक्षा आहे .
गेल्यावेळी 19 वा हप्ता म्हणजेच मागचा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी दिला गेला होता . पुढील हप्ता जुलै 2025 या महिन्यात होणार आहे. दरवर्षी प्रत्येक टप्प्यामध्ये चार महिन्याचे अंतर असते .शेतकऱ्यांना एक अशी अपेक्षा होती की जूनमध्ये विसावा हप्ता भेटेल परंतु असे झाले नाही..
मागील काही महिन्यापासून ॲग्री स्टॅक द्वारे किसान आयडी तयार केले होते. त्यामुळे बहुतेक विसावा हप्ता उशिराने येऊ शकतो किंवा पुढील आठवड्यात येण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य शासनाचे जे काही योजना आहेत त्या योजना पारदर्शक पद्धतीने आणि त्वरित मिळावे यासाठी ॲग्री स्टॅक द्वारे योजना राबविण्यात येत आहे.. या योजने अंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी तयार केला जात आहे. ज्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी नाही त्यांना इतर शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास खूप अडचणी येण्याची शक्यता आहे. म्हणूनच सर्व शेतकऱ्यांनी त्वरित फार्मर आयडी तयार करून घ्यावे.
फार्मर आयडी साठी आवश्यक असलेले कागदपत्रे :
१) आधार कार्ड
२) आधार शी लिंक असलेला मोबाईल क्रमांक
३) सातबारा उतारा गाव नमुना आठ अ
४) बँक खात्याशी लिंक असलेला मोबाईल नंबर
Related posts: अखेर शेत जमीन तुकडे-बंदी कायदा रद्द
बिहारमध्ये निवडणुका होत आहे. या निवडणुकीचे निमित्ताने सरकार बिहार मधून विसावा हप्ता जारी करू शकते . कारण नरेंद्र मोदी बिहारमध्ये भेट देणार आहेत . 18 जुलै २०२५ रोजी बिहारमध्ये रॅलीचे आयोजन केले आहे. या दिवसाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसान चा विसावा हप्ता जाहीर करू शकतात. याबाबत अद्याप अधिकृत रित्या नेमका तारीख जाहीर करण्यात आलेले नाही.
पी एम किसान चा पीएम पुढील हप्ता घेण्यासाठी अपडेट आहे की नाही हे नक्की चेक करा...
१ ) E- kyc केवायसी जरूर करून घ्या..
२ ) बँक डिटेल्स व्यवस्थित आहेत की नाही.. हे तालुका कृषी केंद्र येथे भेट देऊन अपडेट करा..
३ ) पी एम किसान डॉट जीओव्ही डॉट इन https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन लाभार्थ्याची स्थिती लाभार्थी म्हणजेच बेनिफिशरी स्टेटस नक्कीच चेक करा..
४ ) फार्मर रजिस्ट्री जरूर करा..CSC सेंटर वर .
फक्त पीएम किसान या पोर्टलवर रजिस्टर असून आत्ता चालत नाही कारण सरकारने फार्मर रजिस्ट्री (PM kisaan Farmer Registery) अनिवार्य केले आहे. यासाठी शेतकरी बंधूं आपल्या जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन रजिस्टर करू शकतात.
إرسال تعليق