वेस्ट इंडिजचा संघ फक्त 27 धावांवर बाद, मिचेल स्टार्कने 15 चेंडूत रचला मोठा विक्रम ..!
![]() |
मिचेल स्टार्कने 15 चेंडूत रचला मोठा विक्रम..! |
WI vs AUS TEST : ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची कसोटी मालिका 3-0 ने जिंकली आणि वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश दिला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 225 धावा केल्यानंतर वेस्ट इंडिजचा डाव 143 धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात 121 धावांच्या आघाडीसह 204 धावांचं लक्ष्य ठेवलं. पण वेस्ट इंडिजचा फक्त संघ 27 धावांवर पूर्ण संघ बाद झाला.
मिचेल स्टार्कने 15 चेंडूत रचला मोठा विक्रम :
ऑस्ट्रेलियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने कसोटी क्रिकेटमध्ये एक नवा विश्वविक्रम रचला आहे. फक्त 15 चेंडूत त्याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. जमैकाच्या सबिना पार्क मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात स्टार्कने शानदार गोलंदाजी केली.
दुसऱ्या डावातील पहिले षटक टाकणाऱ्या मिचेल स्टार्कने एकही धाव न देता 3 विकेट्स घेतल्या. तिसऱ्या षटकात त्याने 6 धावा देऊन आणखी 2 विकेट्स घेतल्या. यासह त्याने फक्त 15 चेंडूत पाच विकेट्स घेतल्या. यासह स्टार्कने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत पाच विकेट्स घेण्याचा मान मिळवला आहे.
तसेच स्कॉट बोलंड ने सुद्धा तेराव्या षटकात (हॅट्रिक) सलग तीन विकेट्स काढल्या आणि विंडीजचा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला .
वेस्ट इंडिजचे ७ फलंदाज शून्यावर बाद :
वेस्ट इंडिजचे तब्बल ७ फलंदाज शून्यावर बाद .वेस्ट इंडिजच्या ७ फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. यामध्ये त्यांचे सलामीवीर जॉन कॅम्पबेल आणि कर्णधार रोस्टन चेस यांचा समावेश होता. याशिवाय केल्विन अँडरसन, ब्रँडन किंग, शमार जोसेफ, जोमेल वॉरिकन आणि जेडेन सील्स यांनाही खाते उघडता आले नाही.वेस्ट इंडिज संघाच्या पहिल्या सहा फलंदाजांनी फक्त 6 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या सहा फलंदाजांनी एकत्रित केलेली ही सर्वात कमी धावसंख्या आहे. ऑस्ट्रेलियन संघाच्या टॉप 6 फलंदाजांनी 12 धावा केल्या होत्या. 1888 मध्ये सिडनी येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात 12 धावांवर 6 खेळाडू तंबूत परतले होते.
यापूर्वीचा विक्रम :
यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा एर्नी टोशॅक, इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड आणि ऑस्ट्रेलियाच्या स्कॉट बोलँड यांच्या नावावर होता. एर्नी टोशॅकने 1947 मध्ये टीम इंडियाविरुद्ध 19 चेंडूत पाच विकेट्स घेतल्या होत्या. स्टुअर्ट ब्रॉडने 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 19 चेंडूत 5विकेट्स घेतल्या होत्या. स्कॉट बोलँडने 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध 19 चेंडूत पाच विकेट्स घेतल्या होत्या.
मिचेल स्टार्कने या तिघांचा विश्वविक्रम मोडून एक नवा इतिहास रचला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध 2.3 षटकांत पाच बळी घेतले. स्टार्कने कसोटी इतिहासात सर्वात कमी चेंडूत पाच बळी घेणारा गोलंदाज म्हणून विश्वविक्रम रचला आहे.
मिचेल स्टार्कने दुसऱ्या डावात 7.3 षटकं टाकत 9 धावा देत 6 गडी बाद केले. मिचेल स्टार्कने कसोटीत 400हून अधिक विकेट घेण्याचा मान मिळवला आहे. त्याच्या नावावर आता 402 विकेट आहेत. अशी कामगिरी करणारा दुसरा डावखुरा गोलंदाज आहे. यापूर्वी पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रमने 414 विकेट सह हा मान मिळवला आहे.
या लाजिरवाण्या पराभवानंतर विंडीज संघाला क्रिकेट बोर्डाने चांगलेच धारेवर धरले आहे .
इतर पोस्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ENG vs IND : रवींद्र जडेजाची एकाकी झुंज अपयशी, इंग्लंडचा लॉर्ड्समध्ये 22 धावांनी विजय । भारताचा निसटता पराभव
إرسال تعليق