अथांग समुद्र, अटळ मृत्यू आणि प्रचंड इच्छाशक्ती – रवींद्रनाथ यांची विलक्षण कहाणी

 अथांग समुद्र, अटळ मृत्यू आणि प्रचंड इच्छाशक्ती – रवींद्रनाथ यांची विलक्षण कहाणी


अथांग समुद्र, अटळ मृत्यू आणि प्रचंड इच्छाशक्ती – रवींद्रनाथ यांची विलक्षण कहाणी



पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात राहणारे रवींद्रनाथ, काही दिवसांपूर्वी आपल्या १५ मच्छीमार साथीदारांसह बंगालच्या उपसागरात हल्दिया जवळ मासेमारीसाठी गेले होते. मात्र अचानक वातावरणाचा रंग बदलला.तर  MH १ २  या ब्लॉग वर याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ ..

जोरदार वादळ, मोठं मोठ्या उंच लाटा आणि त्या वादळात त्यांचा मासेमारी करण्याचा बोट उलटला.

सगळेच समुद्राच्या खोल लाटांमध्ये वाहून गेले – रवींद्रनाथही!


🏊 पण पाणी त्याचा शत्रू नाही तर त्याचा श्वास होता ...


पण रवींद्रनाथ घाबरला नाही.

तो मच्छीमार होता – पाण्यातला योद्धा!

त्याने हार मानली नाही.

तो पाच दिवस सतत समुद्रात पोहत राहिला, अविरत पणे,न थकता, न थांबता... वरती केवळ आकाश, आणि खाली अथांग सागर..

अथांग समुद्र, अटळ मृत्यू आणि प्रचंड इच्छाशक्ती – रवींद्रनाथ यांची विलक्षण कहाणी



जेव्हा पाऊस पडत असे, तेव्हा तो पावसाचं पाणी प्यायचा...

ना अन्न, ना गोड पाणी... केवळ जगण्याचा हट्ट आणि मनातली एकच इच्छा – "मी वाचेन!"  त्याच्या इच्छाशक्तीसमोर ते  अफाट असा समुद्र सुद्धा क्षुल्लक ठरला..

✊ सावरकरांची आठवण... एक प्रेरणादायक प्रसंग


रवींद्रनाथच्या या धाडसाची आठवण करून देतो स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ८ जुलै १९१० रोजीचा प्रसंग.

S.S. Morea या ब्रिटिश जहाजातून त्यांना अंदमान च्या तुरुंगात नेत असताना त्यांनी फ्रान्सजवळ समुद्रात उडी मारून स्वा. सावरकरांनी अथांग अश्या महासागराला आव्हान दिलं होतं.

रवींद्रनाथचं पोहणं आणि सावरकरांची उडी – दोन्ही घटना प्रखर इच्छा शक्ती, धैर्याच्या आणि जिद्दीच्या प्रतीकं आहेत...

🚢 मानवतेचा संदेश देणारे– 'एमव्ही जवाद' चे खलाशी

5व्या दिवशी... बंदरापासून जवळ जवळ 600 किलोमीटर दूर तो पोहत गेला होता , पण त्याचं दैव बलवत्तर.....! सुदैवाने बांगलादेशच्या कुतुबदिया बेटाजवळ, 'एमव्ही जवाद' नावाचं जहाज जात होतं. जहाजाच्या कॅप्टनने दूरवर समुद्रात काही हलताना पाहिलं.... नीट पाहिलं... कोणीतरी माणूस पोहत होता!

जहाजावरील लोकांनी लगेच लाइफ जॅकेट फेकलं, पण ते रवींद्रनाथपर्यंत पोहोचलं नाही. तरीही ते लोकं थांबले नाहीत... त्यांनी सीमा, धर्म, जातीच्या रेषा विसरून फक्त एकच गोष्ट पाहिली --- माणूस.


काही अंतरावर रवींद्रनाथ पुन्हा दिसला, आणि यावेळी कॅप्टनने रविंद्रनाथ कडे जहाज वळवलं. लाइफ जॅकेट पुन्हा फेकलं गेल्या, आणि यावेळी रवींद्रनाथने ते पकडलं.


क्रेनने त्याला वर खेचलं गेलं, थकलेला, अर्धमेला, पण जिवंत. जेव्हा तो जहाजावर चढला, तेव्हा संपूर्ण जहाजावरील खलाशी आनंदाने ओरडले. त्यांनी फक्त एक माणूस पाहिला नाही, तर माणुसकीला जिवंत पाहि

लं.

त्याच्या वाचण्याचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला… पण त्यापेक्षा मोलाची गोष्ट होती – त्या क्षणी जगाने माणुसकीचा विजय पाहिला.



शेवटी,

रवींद्रनाथ वाचला – त्याच्या इच्छा शक्ती ने....

पण त्याला वाचवलं – दुसऱ्याच्या माणुसकीने!

कधी कधी एका माणसाचा जीव वाचवणे म्हणजे संपूर्ण मानवतेचं संरक्षण असतं.

रवींद्रनाथने आपली जिद्द दाखवली आणि 'एमव्ही जवाद'च्या खलाशांनी आपली माणुसकी.


> आजही जग चालतं आहे... कारण अजून कुठे ना कुठे माणुसकी जिवंत आहे!

0 تعليقات

إرسال تعليق

Post a Comment (0)

أحدث أقدم