वडिलांनी जर जमीन,मालमत्ता एकाच मुलाच्या नावावर केली ,तर दुसऱ्या मुलाचा हक्क काय असतो ...?

           वडिलांनी जर जमीन,मालमत्ता एकाच मुलाच्या नावावर केली ,तर दुसऱ्या मुलाचा हक्क काय असतो ...?

वडिलांनी जर जमीन ,मालमत्ता एकाच मुलाच्या नावावर केली ,तर दुसऱ्या मुलाचा हक्क काय असतो ...?
वडिलांनी जर जमीन,मालमत्ता एकाच मुलाच्या नावावर केली ,तर दुसऱ्या मुलाचा हक्क काय असतो ...?

                     भारतात, मालमत्तेचा वारसा मिळणे हे खूप महत्त्वाचे आहे, कारण ते मालकाच्या मृत्यूनंतर मालमत्तेवर आणि संपत्तीवर वारसांच्या वंशाचे आणि कायदेशीर अधिकारांचे संरक्षण करण्याशी संबंधित आहे. विविध सांस्कृतिक आणि धार्मिक पार्श्वभूमीमुळे भारतात मालमत्तेचा वारसा गुंतागुंतीचा असू शकतो. भारतीय उत्तराधिकार कायदा १९२५ आणि हिंदू उत्तराधिकार कायदा १९५६ सारखे कायदे आहेत, जे मालमत्ता आणि मालमत्तेचे न्याय्य वितरण सुनिश्चित करण्यासाठी अनेक तरतुदी मांडतात. ते मालमत्तेशी संबंधित वादांची शक्यता देखील प्रतिबंधित करते आणि सर्व वारसांना मालमत्तेचा वारसा मिळण्याचा समान अधिकार मिळतो याची खात्री करते.

        आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये घर , जागा ,शेत जमीन अश्या अनेक मालमत्तेचे आर्थिक आणि भावनिक महत्व फार असते .जेव्हा वडील जर त्यांच्या हयातीत मालमत्ता वाटप करून देत असतील, तर सर्वांची हीच अपेक्षा असते कि ती मालमत्ता सर्व मुलांना योग्य आणि समानरीत्या वाटली जाईल ...

       पण काही काही वेळा असे प्रसंग येतात कि वडील जमीन किंवा मालमत्ता फक्त एकाच मुलाच्या नावावर लिहून देतात ,अश्या वेळी इतर भावंडे नाराज होतात आणि त्यांच्यात कायदेशीर वाद , भांडणे निर्माण होऊ शकतो .तर MH  १ २  ब्लॉग वरील या लेखात आज आपण जर वडील त्यांच्या मालकीची संपत्ती फक्त एकाच मुलाच्या नावावर लिहून देतात... त्यावेळी इतर मुलांचा त्यावर काय अधिकार असतील हे आपण सविस्तर पाहू ...

       एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या कष्टाने व स्वतः संसाधनांचा वापर करून खरेदी केलेली मालमत्ता ही स्वतः मिळवलेली मालमत्ता म्हणून ओळखली जाते.जसे कि व्यवसाय ,नोकरी ,गुंतवणूक वारसा नसलेली खरेदी ....यावर वडिलांचा पूर्ण तसेच स्वतंत्र हक्क तयार होतो .अशावेळी वडील ती मालमत्ता कुणालाही देऊ शकतात - एकाला किंवा दोघांना किंवा अगदी इतर कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला सुद्धा ..!  एका बिंदूनंतर स्वतः मिळवलेली मालमत्ता वडिलोपार्जित मालमत्ता बनते.


Related posts: वडिलोपार्जित जमीन किंवा मालमत्ता नावावर कशी करायची...?



       वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे एखाद्या पुरूष हिंदू कुटुंबातील सदस्याला त्याच्या वडिलांकडून, आजोबांकडून किंवा आजोबांच्या वडिलांकडून वारशाने मिळालेली मालमत्ता. जर इतर कोणत्याही नातेवाईकाला ही मालमत्ता वारसाहक्काने मिळाली तर ती वडिलोपार्जित मालमत्ता मानली जात नाही. वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये प्रामुख्याने खालील वैशिष्ट्ये असतात:

  • ती चार पिढ्यांपेक्षा जास्त काळ हिंदू संयुक्त कुटुंबाकडे असावी लागते.
  • ती अविभाजित असावी आणि जर ती विभागली गेली तर प्रत्येक व्यक्तीला मालमत्तेत स्वतंत्र आणि समान वाटा मिळाला पाहिजे.
  • जर चार पिढ्या जिवंत असतील तर त्या सर्वांचा मालमत्तेवर संयुक्त हितसंबंध आणि ताबा असेल.
वडिलोपार्जित मालमत्तेवरील अधिकार त्यांच्या पूर्वजांच्या मृत्यूमुळे नाही तर जन्माने असतो.
                अश्या मालमत्तेवर वडील आपले संपूर्ण हक्क सांगू शकत नाहीत तसेच ते ती मालमत्ता फक्त एका मुलाच्या नावावर लिहून देणे कायदयानुसार चुकीचे ठरते .
       मालमत्ता हस्तांतरण प्रकार :
         वडील मालमत्ता दोन प्रकारे हस्तांतरित करू शकतात .
१ ) दानपत्र 
            जर वडील जिवंत असतील आणि स्वतः कमावलेलं मालमत्ता एका मुलाला दान म्हणून करत असतील तसेच ते कायदेशीर दानपत्राच्या माध्यमातून जर रजिस्टर केले गेले असेल ,तर हे हस्तांतरण कायमस्वरूपी असते .अश्या वेळी इतर भावांचा काहीच दावा त्यावर राहत नाही .
२ ) वसियत (Will) 
               वडील आपल्या मृत्यूपूर्वी वसियत (Will) लिहून ठेवतात ,त्यामध्ये ते कोणत्या मुलास काय काय द्यायचं आहे ,हे स्पष्ट करतात .आणि अश्या वेळी हे वडिलांच्या मृत्यूनंतर लागू होते .या प्रकरणात जे काही मालमत्ता ,संपत्ती आहे , हे सर्व त्यांच्या इच्छेनुसार समान वाटली जाते .
हिंदू उत्तराधिकार कायदा ,१ ९ ५ ६  नुसार ,
अ ) वडिलोपार्जित मालमत्ता असेल ,तर सर्व वारसांना त्या संपत्तीवर एकसमान हक्क असतो .
आ ) परंतु ,जर वडिलांनी स्वतः कमावलेली संपत्ती त्यांना हवी तसं ते वाटप करू शकतात .
           आणि 
जर वडील वसियत न करता मरण पावले ,तर त्यांच्या सर्व संपत्तीचे विभागणी कायद्यानुदार जे कोणी सर्व वारसदार असतील त्यांच्यामध्ये एकसमान विभाजन होते .

0 تعليقات

إرسال تعليق

Post a Comment (0)

أحدث أقدم