IEX Share Price 28% नी घसरले । पॉवर स्टॉक ची बत्ती गूल । गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले ..!
IEX Share Price Crash: Retail shareholding has dropped for five straight quarters
मुंबई:Indian Energy Exchange आईएक्स (इंडियन एनर्जी एक्सचेंज IEX) शेअर आज २८% कोसळल्याने गुंतवणूकदारांचे थोडे थोडके नाही तर तब्बल १३.६ लाख रुपयांचे किरकोळ गुंतवणूकदारांना १४५० कोटींचे नुकसान झाले आहे. कंपनीचा शेअर आज बाजारात २८% घसरल्याने बाजारात हाहाकार उडाला आहे .अखेरच्या सत्रात बंद होताना कंपनीच्या शेअर्समध्ये २७.८९% घसरण झाल्याने कंपनीची शेअर १३५.४९ रूपयांवर बंद झाला आहे. ही महाकाय घसरण केवळ एका निर्णयामुळे झाली ज्यात देशाच्या केंद्रीय विद्युत नियामक आयोग (Central Electricity Regulatory Commission CERC) या नियामक मंडळाने सगळ्या एनर्जी एक्सचेंजवर Market) भारतातील सर्व पॉवर एक्सचेंजेसमध्ये टप्प्याटप्प्याने मार्केट कपलिंग सुरू करण्यास मान्यता दिल्याने गुरुवारी अखेर सत्रात इंडियन एनर्जी एक्सचेंजेस (IEX) च्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.
गुंतवणूकदारांची चिंता
👉 विश्लेषकांच्या मते, जर IEX चा भाव ₹150 च्या खाली गेला, तर तो आणखी घसरू शकतो.
मार्केट कपलिंग म्हणजे एक पद्धत जी ऊर्जा बाजारपेठेत वेगवेगळ्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्म किंवा एक्सचेंजेसमध्ये वीजेसाठी एकच, एकसमान किंमत तयार करण्यासाठी एक सुनियोजित मॉडेल वापरले जाते. ज्याचा फटका बाजारात मोठ्या प्रमाणात बसला होता. आज जून २०२५ च्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. आणि आजच कंपनी आपला तिमाही निकाल जाहीर करणार असल्याने बाजारातील या शेअर्समध्ये अस्थिरतेचे वातावरण व घबराट पसरल्याने गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात या शेअरची दबावापोटी विक्री केली असल्याची शक्यता आहे.
सरकारच्या नवीन नियमांमुळे धक्का
बुधवारी याविषयी कमिशनने लेखी सूचनांच्या आधारे निर्णय लागू करण्याचे ठरविले. आपल्या निर्णयात कमिशनने अधिकृतपणे म्हटले आहे की,'CERC च्या मते, ग्रिड-इंडियाने केलेल्या सबमिशन आणि झालेल्या विविध सल्लामसलतींच्या आधारे.आयोगाने टप्प्या टप्प्याने मार्केट कपलिंग लागू करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.' असे म्हटले. पॉवर मार्केट कपलिंग ही वीज बाजारपेठांमध्ये अनेक पॉवर एक्सचेंजेसकडून बोली एकत्रित करून आणि त्यांना केंद्रीयरित्या मंजूर करून केली जाणारी एक यंत्रणा आहे.IEX ची प्रतिक्रिया :
✋✋ कंपनीने 2024-25 च्या वाढीचे लक्ष्य कायम ठेवले आहे.
गुंतवणूकदारांनी काय करावे ?
ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, कंपनीचा मागोवा घेणाऱ्या १३ विश्लेषकांपैकी सात जणांनी 'खरेदी' रेटिंग कायम ठेवले आहे, तिघे 'होल्ड' करण्याची शिफारस करतात आणि तिघे 'विक्री' करण्याची शिफारस करतात. सरासरी १२ महिन्यांच्या सहमती किंमतीच्या लक्ष्यात ४५.१% ची वाढ दिसून येते.
إرسال تعليق