Mahavitaran Go Green Scheme : ‘गो-ग्रीन’मधून वीजबिलात १२० रुपयांची सवलत..!
वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून ई-मेल व मेसेजचा पर्याय निवडणाऱ्या म्हणजे Go Green रजिस्टर लघुदाब ग्राहकांचा महावितरणच्या गो-ग्रीन योजनेतील सहभाग सध्या पाच लाखाच्या वर पोचला आहे.याबद्दल अधिक माहिती MH १ २ या ब्लॉग वर जाणून घेऊ ...!
![]() |
Mahavitaran Go Green Scheme : ‘गो-ग्रीन’मधून वीजबिलात १२० रुपयांची सवलत..! |
गो ग्रीन निवडलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे ६० हजारांवर ग्राहक आहेत. पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी महावितरणने ‘गो-ग्रीन’ योजना सुरू केली आहे . योजनेच्या माध्य्मातून वीजबिलासाठी छापील कागदाचा वापर कमी करण्यावर भर आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात तर सर्वाधिक दोन लाख एक हजार २३३ ग्राहक योजनेचा लाभ घेत असून, त्यांना दरवर्षी जवळजवळ दोन कोटी ४२ लाख रुपयांचा वीजबिलात फायदा होत आहे.
गो-ग्रीन योजनेचा पर्याय निवडल्यानंतर संबंधित ग्राहकांच्या पहिल्याच वीजबिलामध्ये पुढील १२ महिन्यांची म्हणजे आगाऊ १२० रुपयांची सवलत एकरकमी देण्यात येत आहे. पूर्वी ही सवलत प्रत्येकी १० रुपये प्रत्येक बिलामध्ये दार महिन्याला मिळत होती. आतापर्यंत राज्यातील पाच लाख चार हजार पर्यावरणस्नेही वीजग्राहक या योजनेत सहभागी झाले असून, त्यांना जवळजवळ सहा कोटी चार लाख ५५ हजार ४०० रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे.
गो-ग्रीन योजनेचे फायदे
प्रति बिल ₹10 कपात
आपण जर ई‑बिल (ई‑मेल + SMS) साठी नंतर प्रिंटेड बिल घायचं सोडलं , तर प्रत्येक महिन्यात ₹10 रुपये सवलत मिळते.एका वर्षात जवळजवळ ₹120 बचत होते.
खर्चात बचत आणि पर्यावरणीय संरक्षण
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो ग्राहक दरवर्षी करोडों रुपये वाचवतात – फक्त पेपर/कागद व बचतीमुळे...!
वीज बिल भरणे सोपे
ई‑बिल मिळाले की लगेच ऑनलाईन पेमेन्ट करता येतो + अॅप/वेबसाईटवर संपूर्ण इतिहास उपलब्ध.
ई‑बिल मोबाइल App किंवा वेबसाईटवर सहज डाउनलोड करता येतात. मागील 11 महिन्यांचे बिल देखील मिळतात, आपल्याला जर आवश्यक असल्यास आपण प्रिंट काढू शकता.
Go Green रजिस्टर करण्याची प्रक्रिया
१ . MSEDCL च्या App अथवा www.mahadiscom.in संकेतस्थळी जा.
२ . “Go Green” किंवा “Digital Billing” पर्याय निवडा.
३ . ई‑मेल आणि SMS तपशील भरून सबमिट करा.
महावितरणच्या संगणक सिस्टिम द्वारे आपल्याला नोंदणीकृत ई-मेल किंवा मोबाईलवर मेसेजद्वारे दरमहा वीजबिल पाठविण्यात येते..
वीजबिलाच्या तारखेपासून सात दिवस च्या आत आपण जर वीज बिल भरल्यास एक टक्का सवलत; त्यासाठीही वीजबिल तत्काळ ऑनलाइनद्वारे भरणे सोयीचे झाले आहे...
RELATED POST : जर तुम्ही वीज बिल कमी करू इच्छित असाल, तर TOD स्मार्ट मीटरचा उपयोग नक्की करा ...!
إرسال تعليق