जर तुम्ही वीज बिल कमी करू इच्छित असाल, तर TOD स्मार्ट मीटरचा उपयोग नक्की करा ...!

 राज्यभरात वीज ग्राहकांना महावितरण करून बसविण्यात येत असलेले (TOD) Digital Electric Unit Reading Meter.मीटर नेमके आहे तरी काय?आणि याचा काय फायदा होणार आहे?. असे प्रश्न पडलेले आहेत. तर चला जाणून घेऊया…प्रीपेड मीटर पेक्षा हे TOD मीटर नेमके कसे असणार आहे, आणि यामुळे वीज ग्राहकांना काय फायदा मिळणार आहे…..?

      असे प्रश्न जर तुम्हाला पडले असेल तर MH 12 या ब्लॉग वर आपण जाणून घेऊया, हे TOD मीटर नक्की काय आहे आणि त्याचे फायदे...

🔌 TOD स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर म्हणजे काय?

जर तुम्ही वीज बिल कमी करू इच्छित असाल, तर TOD स्मार्ट मीटरचा उपयोग नक्की करा!जर तुम्ही वीज बिल कमी करू इच्छित असाल, तर TOD स्मार्ट मीटरचा उपयोग नक्की करा!

TOD म्हणजेच Time of Day. हे स्मार्ट मीटर अशा प्रकारचे असतात की जे वापरलेल्या वीजेचे दर वेळेनुसार बदलतात. हे पारंपरिक मीटरपेक्षा अधिक स्मार्ट असतात कारण हे दिवसातील विविध वेळांमध्ये  आपण जे काही वीज वापरतो ते वीज वापर किती झाला आहे हे स्वतंत्रपणे दाखवतात.


🌟 TOD स्मार्ट मीटरचे वैशिष्ट्ये:

1. वेळेनुसार दर (Time-based Tariff):

दिवसातील तीन मुख्य वेळा असतात:

ऑफ पीक अवर्स (Off-Peak Hours): वीज दर सर्वात कमी असतो.

नॉर्मल अवर्स (Normal Hours): सामान्य दर.

पीक अवर्स (Peak Hours): दर सर्वात जास्त असतो.

2. ऊर्जेचा बचत होतो:

ग्राहक जर पीक अवर्समध्ये वीज वापरणे टाळले, तर त्यांना कमी बिल येते.

3. स्मार्ट वाचन म्हणजेच (Smart Readings):

हे मीटर डिजिटल असतात आणि त्यांचे रीडिंग रिअल-टाईममध्ये घेता येते.

4. मोबाईल अ‍ॅप / वेबसाइटवर डेटा उपलब्ध:

ग्राहक त्यांचा वीज वापर आणि बिल तपशील ऑनलाईन पाहू शकतात.

5. बिलिंग पारदर्शकता (Billing Transperacy):

वापरकर्त्यांना नेमके किती युनिट कोणत्या वेळेस वापरले गेले हे कळते.

📅 वेळेनुसार ⏰दर कसे असतात?


(सामान्य उदाहरण; प्रत्यक्ष वेळ व दर वितरण कंपनीनुसार बदलू शकतो)

वेळ वीज दर प्रकार 

रात्री 10 ते सकाळी 6 Off-Peak कमी दर

सकाळी 6 ते दुपारी 5 Normal सामान्य दर

दुपारी 5 ते रात्री 10 Peak जास्त दर

---


TOD मीटर चे फायदे:

महावितरणचे असे म्हणणे आहे की,जुने मीटर प्रीपेड मीटर किंवा सदोष नादुरुस्त मीटरच्या जागी आणि नवीन वीज जोडणी मध्ये टीओडी मीटर लावल्यास त्याचा खूप फायदा मिळणार आहे.

वीजेचा शहाणपणाने वापर करता येतो.

घरगुती व औद्योगिक वापरात खर्च नियंत्रण करता येतो.

ऊर्जा साठवण्याचे व सौर ऊर्जेचे व्यवस्थापन सोपे होते.

पर्यावरणपूरक वापरास चालना मिळते.

TOD मीटर कोणी वापरू शकतो?

घरगुती ग्राहक..

व्यावसायिक संस्था..

औद्योगिक ग्राहक..

(विशेषतः ज्यांना दिवसातील विविध वेळेत खूप वीज लागते)     

महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांच्या घरात आणि व्यवसायिक उद्योगांमध्ये टीओडी मीटर प्रत्यक्ष बसविल्यानंतर महावितरण ला वीज ग्राहकांना कोणताही शुल्क अदा करावा लागणार नाही.



RELATED POST : Mahavitaran Go Green Scheme : ‘गो-ग्रीन’मधून वीजबिलात १२० रुपयांची सवलत..!

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post