महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागात भरती

 महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागात भरती



महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाने गट क या प्रवर्गातील 154 रिक्त पदांची मेगा भरती जाहीर केली आहे. कनिष्ठ आरेखक आणि अनुरेखक  (गट क) ह्या प्रवर्गातील ही पदे भरणार आहेत.. जर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या शासकीय सेवेत सामील होण्याचे स्वप्न पाहत असाल तर हे तुम्हाला एक सुवर्णसंधी आहे असे म्हणावे लागेल... तर आजच्या MH 12 या ब्लॉग वर आपण या बाबत अधिक माहिती घेऊ.. हे संधी तुमच्या भविष्याला एक नवीन दिशा देऊ शकते. 

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागात भरती
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागात भरती 

शैक्षणिक पात्रता :

या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण तसेच दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय कार्य अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागात भरती


वयोमर्यादा: 

१) खुला प्रवर्ग : वय 18 ते 38 पर्यंत 

२) अराखीव प्रवर्ग : वय 18 ते 43 वर्षां पर्यंत 

वेतन श्रेणी: 

निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या वेतन मानानुसार आकर्षक वेतन श्रेणी असेल.

१) कनिष्ठ आरेखक गट क वेतनस्तर एस 8 , रु २५५०० ते ८११०० रुपये 

तसेच नियमानुसार अधिक वेतन भत्ते देय असतील.

२) अनुरेखक गट क वेतन स्तर एस ७ नुसार रु २१७०० ते ६९१०० रुपये असेल तसेच नियमानुसार अधिक वेतन भत्ते देय असतील.

अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम तारीख: 

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अंतिम तारीख आहे 20 जुलै 2025 

ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर परीक्षा शुल्क  21 जुलै 2025 पर्यंत परीक्षा शुल्क भरू शकतो.

परीक्षा शुल्क: 

१) अराखीव प्रवर्ग साठी १००० ₹

२) इतर प्रवर्ग साठी ९०० ₹

३) माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणतेही परीक्षा शुल्क नाही.

अधिक माहितीसाठी शासनाच्या नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागाच्या वेबसाईटला भेट द्या.


0 تعليقات

إرسال تعليق

Post a Comment (0)

أحدث أقدم