Ranbhajya In Marathi | रानभाज्यांचे आयुर्वेदिक महत्व | पावसाळ्यातील रानभाज्या आरोग्यास बहुगुणी
पावसाळा सुरू झाला की आपल्याकडे रानभाज्यांची काही कमतरता नसते... महाराष्ट्र सारख्या राज्यात निसर्गाने समृद्ध अशा सुपीक मातीत... शेतात , शेताच्या बांधावर खूप प्रकारच्या रानभाज्या आढळतात.. जिकडे पहावं तिकडे विविध प्रकारच्या रानभाज्या आपल्याला दिसतात... पण कित्येक लोकांना त्या रानभाज्या चे महत्त्व कळत नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात . पावसाळ्यात सहज उगवणारे नैसर्गिक रानभाज्या आपल्या आरोग्यासाठी फारच फायदेशीर आहेत... फक्त आपल्याला त्या कोणत्या भाज्या आणि कशा ओळखावेत तसेच त्यांचे उपयोग काय हे समजून घ्यायला हवे... पावसाळा संपेपर्यंत आठवड्यातून किमान दोन-तीन दिवस तरी आपल्या आहारात रानभाज्यांचा समावेश असणे गरजेचे ठरते..तर आजच्या MH 12 या ब्लॉग वर आपण पावसाळ्यात सहज उपलब्ध होणाऱ्या काही रानभाज्या कोणत्या ते पाहू...
![]() |
विविध प्रकारच्या रानभाज्या |
१) तांदूळजा या भाजीचे आरोग्यदायी फायदे...
तांदूळजा भाजी मध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने बद्धकोष्ठता constipation दूर होते, तसेच पचनसंस्था सुधारते . यामध्ये अँटिडॉक्सिडंट असतात, जे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. या भाजीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असल्यामुळे सांधेदुखी, सूज किंवा अंगदुखीवर उपयोग होतो, तसेच यामध्ये जीवनसत्व A भरपूर प्रमाणात असते.
२) चाकवत भाजीचे आरोग्यदायी फायदे
पारंपारिक आयुर्वेदामध्ये चाकवत भाजीचा उपयोग लिव्हर साफ करण्यासाठी केला जात असे. या भाजीमध्ये फायबर जास्त आणि कॅलरी कमी असल्यामुळे वजन नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच या भाजीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.. लघवीशी संबंधित विकारावर चाकवत भाजी उपयुक्त मानली जाते..
इतर posts वाचण्यासाठी येथे क्लिक करा: 👉👉 ती' वयात येताना | पहिलं प्रेम आणि मनाचा गोंधळ
३) काटे माट किंवा काटेरी वांगी भाजीचे उपयोग
हे भाजी श्वसन संस्थेसाठी फायदेशीर आहे. खोकला, दमा, श्वास घेण्यास त्रास तसेच कफ करण्यासाठी ही भाजी उपयोगी आहे.
शरीरातून विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी काटेमाठ ही भाजी उपयुक्त आहे . हे उत्तम लिव्हर टॉनिक मानले जाते.
ही भाजी त्वचारोग पुरळ खाज यावर उपयोगी आहे . आयुर्वेदामध्ये याचा वापर बाह्य आणि अंतर्गत अशा दोन्ही प्रकारे होतो.
४) शेवगा (Drumstick)
शेवग्याचे संपूर्ण झाड हे खूप उपयुक्त आहे .त्याचे पाने, फुले आणि शेवगा आपल्या आरोग्यासाठी फारच फायदेशीर असतात. फुले ही पांढऱ्या रंगांची आणि चवीला थोडासा गोडसर असतात
फायदे.. शेवग्याच्या पानांमध्ये प्रथिने, लोह, कॅल्शियम, A आणि C जीवनसत्व असतात हे हाडांना मजबूत करतात. शरीरातील रक्त वाढते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
५) कुर्डू भाजीचे आरोग्यदायी फायदे
ही एक कोवळी, गडद गुलाबी आणि हिरव्या रंगाची फुलपाखरा सारखी दिसणारी भाजी आहे. ही भाजी स्वयंपाक घरात मोठ्या प्रमाणात वापरली जाते
फायदे. कुरडू ही भाजी वात कापशामक असून पचनासाठी खूप उपयुक्त आहे. ही भाजी शरीरातील उष्णता कमी करते .आयर्न, फायबर्स आणि अँटिऑक्सिडंट इत्यादींचे प्रमाण खूप असते.
६) अळूची पाने आरोग्यासाठी फायदेशीर
आळू हे पावसाळ्यात उगवणारी एक रुचकर व उपयुक्त अशी रानभाजी आहे. ही भाजी सुपीक मातीत आणि ओलसर जमिनीत भरभरून उगते. अळूच्या पानांचा उपयोग पातळ भजी, भाजी ,वडे इत्यादी मध्ये वापरतात .
फायदे.. अळूच्या पानांमध्ये विटामिन ए, व्हिटॅमिन सी आणि एंटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असतात.. फायबर सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते.. ही भाजी डोळ्यांचे आरोग्य, रक्ताचे शुद्धीकरण आणि पचनासाठी फार फायदेशीर आहे. कॅल्शियम जे हाडांना मजबूत करते ते सुद्धा या भाजीमध्ये आढळते. आयुर्वेदामध्ये अळूच्या पानाचे सेवन वात शामक म्हणून करतात.
सूचना. या भाज्या योग्य प्रमाणातच आणि वैद्यकीय सल्ल्याने च सेवन करावे, गर्भवती, स्तनपान करणाऱ्या महिला आणि गंभीर आजार असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच या भाज्या खाव्यात.
إرسال تعليق