दूध आरोग्यासाठी हवेच, पण कोणते...? गायीचे की म्हशीचे?
![]() |
दूध आरोग्यासाठी हवेच, पण कोणते...? गायीचे की म्हशीचे? |
गाय आणि म्हशीच्या दुधात फरक फार कमी लोकांना माहीत आहे.
गायीच्या दूधाचे महत्त्व आणि फायदे:
![]() |
खिलार गाय |
१) हलके व पचण्यास सोपे – गायीचे दूध शरीराला सहज पचते, त्यामुळे लहान मुलांसाठी आणि वृद्धांसाठी अतिशय उपयुक्त असते.
२) स्मरणशक्ती सुधारते – B12 आणि न्युट्रियंट्समुळे मेंदूला फायदा होतो आणि स्मरणशक्ती वाढते.
३) वजन कमी करणाऱ्यांसाठी उत्तम – गायीच्या दुधात फॅटचे प्रमाण कमी असते म्हणून ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे अशा व्यक्तींनी आहारात गायीच्या दुधाच समावेश करावा.
४) रोगप्रतिकारक शक्ती वाढवते – अॅन्टीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्समुळे शरीराला संरक्षण मिळते.तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
थोडक्यात, गायीचे दूध – लहान मुलं, वृद्ध, मधुमेही आणि वजन कमी करणाऱ्या व्यक्तींना उपयोगी ठरते.
![]() |
गायीचे की म्हशीचे? |
म्हशीच्या दूधाचे महत्त्व आणि फायदे :
१) ऊर्जादायक आणि बलवर्धक – म्हशीचे दुधात जास्त कॅलरी आणि फॅटयुक्त असल्यामुळे ताकद वाढवते. शारीरिक श्रमाचे काम करणाऱ्या व्यक्तींनी म्हशीचे दूध आहारात समावेश करावे.
२) शांत झोप मिळवण्यास मदत करते – रात्री कोमट दूध घेतल्यास तणाव कमी होतो. तसेच शांत झोप मिळवण्यास मदत होते.
३) प्रोटीन अधिक असल्यामुळे स्नायू मजबूत होतात – खेळाडू किंवा मेहनती लोकांसाठी म्हशीचे दूध फार उपयुक्त असते.
४) हाडे मजबूत करते – कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण जास्त असल्याने हाडे मजबूत होतात.
थोडक्यात म्हशीचे दूध – खेळाडू, शरीरश्रम करणारे, वजन वाढवू इच्छिणारे लोकांसाठी उपयुक्त असते.
वरील फायदे हे शास्त्रीय दृष्टिकोनातून आहेत तर आता काही सहज आणि सामान्य माहिती खालीलप्रमाणे:
म्हैस आपल्या पिल्लापासून दूर पाठ करून बसते, जरी तिचे पिल्ले कुत्र्यांनी खाल्ले तरी ती त्याला वाचवणार नाही.
तर गाईच्या पिल्लाकडे अनोळखी व्यक्ती आल्यास ( वाघ सुद्धा )जीव देईल पण तो जिवंत असताना वासरांना धोका होऊ देणार नाही.
त्यामुळेच त्याच्या दुधात आपुलकीचा गुण मुबलक आहे.
म्हशीला घाण आवडते, चिखलात देखील बसेल ,
पण गाय शेणावरही बसणार नाही, तिला स्वच्छता आवडते.
म्हशीला घरापासून 2 किमी अंतरावर तलावात सोडून या, ती घरी येऊ शकत नाही, तिची स्मरणशक्ती शून्य आहे.
तर
गायीला घरापासून ५ किमी अंतरावर सोडा.
तिला घरचा रस्ता माहित आहे, ती येईल.गायीच्या दुधात स्मरणशक्ती तीक्ष्ण असते.
दहा म्हशी बांधा आणि त्यांच्या पिल्लांना 20 फूट दूर सोडा, एकही मूल आईला ओळखू शकत नाही.
तर गोशाळांमध्ये दिवसभर गाई-वासरांना स्वतंत्र शेडमध्ये ठेवले जाते, संध्याकाळी जेव्हा प्रत्येकजण आईला भेटतो तेव्हा सर्व वासरे बरोबर (हजारोच्या संख्येने) आपल्या आईला ओळखतात आणि दूध पितात, ही गाईच्या दुधाची आठवण आहे.
म्हशीचे दूध काढल्यावर म्हैस सर्व दूध देते,पण गाय आपल्या कासेतील पूर्ण दुध देत नाही,थोडं दूध शिल्लक राखून ठेवते आणि जेव्हा ती आपली पिल्लं दूध पाजायला घेते तेव्हा शिल्लक दूध पाजते.
हे गुण गायीमध्ये आहेत जे म्हशीत नाहीत.
म्हशीला सूर्य आणि गरमी सहन होत नाही...तर
तर गाय मे-जूनमध्येही उन्हात बसू शकते.
म्हशीचे दूध तामसिक असते तर गाईचे सात्विक असते.
म्हशीच्या दुधात आळस भरलेला असतो, तिचे पिल्लू दिवसभर भांग खाल्ल्यासारखे पडून असते.
जेव्हा दूध काढण्याची वेळ येईल तेव्हा मालक पिल्लाला जबरदस्तीने उठवतो...
इतर posts वाचण्यासाठी येथे क्लिक करा: Ranbhajya In Marathi | रानभाज्यांचे आयुर्वेदिक महत्व | पावसाळ्यातील रानभाज्या आरोग्यास बहुगुणी
पण गायीचे वासरू एवढी उडी मारेल की तुम्ही दोरी सोडू शकणार नाही. वासरामध्ये नेहमी ऊर्जा भरलेली असते.
तरीही लोक म्हशी खरेदीसाठी लाखो रुपये खर्च करतात. तर गाईचे दूध हे अमृतसारखे आहे.
إرسال تعليق