मक्यावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी सविस्तर माहिती.

 लष्करी अळी हे एक बहुभक्षीय कीड असून, ते जवळ जवळ ८० पेक्षा जास्त वनस्पतींवर उपजीविका करते.

मक्यावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी सविस्तर माहिती.
मक्यावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी सविस्तर माहिती.


महाराष्ट्रात खरीप हंगामातील मका  🌽 हे महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. मक्यापासून आपल्याला जनावरांना हिरवा चारा तसेच मका धान्य भेटतो.
अलीकडील काळात मका पिकावर काही ठिकाणी नवीन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झालेला पहावयास मिळतो. मका पिकावर लष्करी अळी चा प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण पिकाच्या उत्पन्नावर फार मोठा परिणाम होतो...
नवीन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मका पीक उगवणी नंतर वीस दिवसापासून ते पिक निघेपर्यंत असतो..
🐛 सुरुवातीच्या अवस्थेत लष्करी अळी ही मक्याच्या कोवळ्या पानावर उपजीविका करते. नाजूक असलेल्या पोंग्याच्या आत मध्ये लष्करी अळी म्हणजेच कीड असते ते तेथील लुसलुशीत असलेला पोंगा खातात . त्यामुळे ते पान पुढे वाढल्यावर पानावर मोठमोठे चित्रे आढळून येतात.
🐛  पूर्ण वाढ झालेल्या लष्करी अळ्या झाडाची पाने खाऊन फक्त पानाच्या मध्यभागी असलेला शिरा शिल्लक ठेवतात.

 तुरा आणि कणीस भरण्याच्या अवस्थेत अळी मक्याच्या कणीस मध्ये प्रवेश करून दाण्यांवर उपजीविका करते. मधुमका (Sweet Corn) हे जास्त प्रमाणात बळी पडतो. आर्थिक नुकसान अधिक होते.  
प्रतिबंधात्मक उपाय
🔴लष्करी अळी 🐛 हे समूहाने अंडी घालतात एक फेरफार नोंद त्या हाताने वेचून नष्ट करावे.
 🔴नवीन लष्करी अळीचे पतंगाच्या नियंत्रणासाठी प्रती हेक्टरी पाच ते सात कामगंध सापळ्याचा वापर करावा.
🔴अळीच्या नियंत्रणासाठी रात्रीच्या वेळी प्रकाश सापळ्यांचा उपयोग केल्यास अळी नियंत्रणामध्ये फार उपयोग होतो.
🔴लष्करी अळीच्या कीड असताना त्याच्या नियंत्रणासाठी प्रतिहेक्टरी किंवा एकरी वीस ते पंचवीस पक्षी थांबे उभे करावा, जेणेकरून पक्षी अळ्या खातील. यामुळे नियंत्रण करण्यास मदत होते.

एकात्मिक व्यवस्थापन


१. पाऊस पडण्याआधी उन्हाळ्यात खोल नांगरट 🌞🚜 करावी . त्यामुळे किडीची कोषावस्था प्रखर सूर्यप्रकाशाच्या तसेच पक्षांच्या संपर्कात येऊन मरून जाते.


२. पिकांची सतत फेरपालट करावी. मका घेतलेल्या शेतात त्यानंतर भुईमूग अथवा सूर्यफूल घ्यावे.


३. पाऊस पडल्यानंतर सुरुवातीस म्हणजेच लवकर पेरणी करावी.शक्यतो उशिरा पेरणी टाळावी.


४. गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी एकाच वेळी पेरणीचे नियोजन करावे. त्यामुळे एका प्रदेशातील मका एकाच वेळी वाढतो. किडीला वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेतील मका उपलब्ध होत नाही.


५. आंतरपीक घेऊन पिकांची विविधता साधावी. उदा. मका+ तूर, उडीद, मूग 


रासायनिक नियंत्रण...


१ )नवीन लष्करी अळीचे नियंत्रणासाठी पिकाच्या पोंग्या मध्ये थायामेथोक्झाम (१२.६ %) अधिक लॅंबडा सायहॅलोथ्रिन (९.५ % झेडसी) (संयुक्त कीटकनाशक) याची फवारणी घ्यावी. दहा-बारा दिवसानंतर पुन्हा पुन्हा वापरावे.

२)  लष्करी अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी स्पिनेटोरम (११. ७ एससी) 20 लिटर पाण्यात दहा ते बारा मिली वापर करावा.


0 تعليقات

إرسال تعليق

Post a Comment (0)

أحدث أقدم