वाद टाळण्यासाठी काय करावे कराल ...?
![]() |
वडिलोपार्जित जमीन किंवा मालमत्ता नावावर कशी करायची...? |
आपल्या आई-वडिलांकडून किंवा आजोबांकडून म्हणजेच वंशपरंपरागत पद्धतीने मिळालेली मालमत्ता वाटून घेताना कुटुंबामध्ये वादाचे मोठे कारण ठरते .भावाभावामध्ये विसंगत ,विसंवाद, न्यायालयीन खटले आणि मानसिक त्रास या सगळ्यापासून मुक्तता मिळवायची असेल तर वंश परागत मालमत्ता नावावर करून घ्यावी . तर आजच्या MH 12 या ब्लॉग वर वडिलोपार्जित जमीन नावावर करून घेण्याची प्रक्रिया समजून घेऊ .
सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे संपत्ती जी काही असेल जमीन जागा किंवा इतर मालमत्ता ते पूर्वजांकडून वंशपरंपरेने मिळालेले असते आणि ती विकत घेतलेली नसते. जर आपले वडील जिवंत असतील तर त्यांनी मृत्युपत्र तयार केलेल्या मालमत्तेसाठी त्यांचे हक्क खूप महत्त्वाचे ठरत असतात मात्र त्यांचे निधन झाल्यावर त्यांचे जे काही वारसदार असतात म्हणजेच पत्नी मुले मुली नातवंडे या सर्वांनाच त्यांच्या संपत्तीमध्ये कायदेशीर हक्क मिळालेला असतो. आणि नंतर ते वाटून घेताना सामांजसपणाने वाटून घेतल्यास काही त्रास उद्भवत नाही.
वारस नोंदणीसाठी (Heirship Entry) खालील कागदपत्रे साधारणपणे आवश्यक असतात:
मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र:
👉 यामध्ये मृत व्यक्तीचे नाव, मृत्यूची तारीख आणि वेळ नमूद केलेली असते.
👉 वारसांचे ओळखपत्र:
अर्जदार आणि इतर वारसांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर सरकारी ओळखपत्रे लागतात.
👉 वारसांचे नाते संबंध दर्शवणारे पुरावे:
जसे की विवाह प्रमाणपत्र (Marriage Certificate), जन्म प्रमाणपत्र (Birth Certificate) किंवा इतर कायदेशीर कागदपत्रे.
👉 संपत्तीचे कागदपत्रे:
जर वारस नोंदणी जमिनीसाठी (Land) असेल, तर जमिनीचे सातबारा उतारा (7/12 Utara) किंवा इतर मालमत्तेची कागदपत्रे आवश्यक असतील.
👉 वारस असल्याचा पुरावा:
मृत व्यक्ती आणि अर्जदार यांच्यातील नातेसंबंधाचा पुरावा आवश्यक असतो.
👉 अर्ज करण्याची प्रक्रिया:
वारस नोंदणीसाठी संबंधित तहसील कार्यालयात किंवा तलाठी कार्यालयात अर्ज करावा लागतो.
तलाठी किंवा तहसीलदार यांच्या कार्यालयात अर्ज करून आपण त्या मालमत्तेचे अधिकृत वारसदार आहोत याचे प्रमाणपत्र काढा .यामुळे तुमच्या नातेसंबंधाची नोंदणी केली जाते.
सातबारा उतारा वर तुमचे नाव नोंदवण्यासाठी स्थानिक तलाठी कार्यालयात एक फेरफार अर्ज आपल्याला दाखल करावा लागतो. हे दाखल करताना आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे आणि जे काही वारसदार असतील त्या सर्वांचे सहमती पत्र जोडावी लागेल.
Related posts: वडिलांनी जर जमीन,मालमत्ता एकाच मुलाच्या नावावर केली ,तर दुसऱ्या मुलाचा हक्क काय असतो ...?
👨❤️💋👨सामंजस पणे चर्चा करा...
मालमत्तेत ज्या कोणाचा अधिकार असतील त्यांचे अधिकार त्यांना द्यावा लागते आणि त्यांना स्पष्ट करून समजावून सांगा .आपल्या भावंडाशी किंवा कुटुंबीयाशी चर्चा करून करार करणे योग्य असते. प्रत्येकाला समान वाटा मिळाला पाहिजे . कायदेशीर कागदपत्रे तयार करण्यासाठी वकिलांचा सल्ला घेतले तर उत्तम.नोंदणीसाठी तज्ञ वकील यांचा सल्ला घेणे आपल्याला फायदेशीर ठरते . त्यामुळे भविष्यात तांत्रिक किंवा कायदेशीर बाबी यांचा त्रुटी होणार नाहीत याची दक्षता घ्या.
إرسال تعليق