Myopia Meaning In Marathi | मायोपिया म्हणजे काय ?
अलीकडील काळात तंत्रज्ञान युगात तरूण अनेक प्रकारच्या विकारांना बळी पडताना दिसत आहेत. जसे की नोमोफोबिया, इगो surfing, बिंज वॉच , ऑनलाइन जुगार , सतत पोर्न व्हिडिओ पाहणे , reels किंवा social media व्यसन, फोमो ई... त्यापैकी मायोपिया (myopia) ही डोळ्यांची अशीच एक समस्या (eye problem) आहे, ज्याला लहान मुलेही (little children) बळी पडताना दिसत आहेत. जीवनशैलीतील व्यत्यय, (lifestyle disturbances) संगणक आणि मोबाईल (Computers, mobiles) स्क्रीनकडे जास्त वेळ पाहण्याची सवय यामुळे या समस्येचा धोका वाढत आहे. मायोपिया (myopia problem) ही समस्या 20 ते 40 वयोगटातील लोकांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येत आहे. तर आजच्या MH 12 या ब्लॉग वर आपण मायोपिया म्हणजे नक्की काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया...
मायोपिया म्हणजे नेमकं काय?
मायोपिया, ज्याला दूरदृष्टीदोष किंवा निकटदृष्टी असेही म्हणतात, ही डोळ्यांची एक सामान्य समस्या आहे. या स्थितीत व्यक्तीला जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात, पण दूरच्या वस्तू धूसर म्हणजेच स्पष्ट दिसत नाहीत.
मायोपियाचे कारण काय?
मायोपिया होण्याचं प्रमुख कारण म्हणजे: डोळ्याचा आकार (eyeball) सामान्यापेक्षा जास्त लांबसर असतो, किंवाकॉर्निया किंवा लेन्स हे फारच वक्र असतात.
त्यामुळे प्रकाशाचे किरण रेटिना (Retina) वर न पडता रेटिनाच्या आधीच फोकस होतात, आणि त्यामुळे धूसर प्रतिमा तयार होते.
Related posts: Hernia In Marathi | हर्निया | हर्निया म्हणजे काय ? | हर्निया मराठी माहिती
मायोपिया ची लक्षणे (Symptoms of Myopia)
१) दूरच्या वस्तू धूसर दिसणे किंवा अस्पष्ट दिसणे .. (उदा. फळ्यावरचे अक्षर, बोर्ड्स, नंबर प्लेट इ.)..
२) सतत डोळे मिचकावणे (squinting).
३) डोकेदुखीस सुरु होणे . (विशेषतः वाचनानंतर किंवा स्क्रीन पाहिल्यानंतर)..
४) रात्री दिसण्यात अडचण येणे . (Night myopia)..
५) मोबाईल किंवा पुस्तक खूप जवळ धरून वाचणे.
१ ) लहान वयोगटातील मुले व किशोरवयीन मुलांमध्ये सामान्यतः वयाच्या 8–16 दरम्यान सुरुवात होते.२ ) वंशपरंपरा (Genetics) – जर आईवडिलांना मायोपिया असल्यास ते मुलांना होण्याचा संभव अधिक असतो.३ ) जास्त वेळ स्क्रीनचा वापर केल्याने सुद्धा उदाहरण - (mobile, computer, TV) चा अती वापर केल्यास मायोपिया होऊ शकतो.४ ) सूर्यप्रकाशात कमी वेळ घालवणे- जे लोकं सतत AC किंवा ऑफिस , घरात किंवा सावलीत खूप वेळ काम करतात त्यांना मायोपिया होण्याची शक्यता असते .
मायोपिया वर उपचार (Treatment)
मायोपिया ओळखण्यासाठी डोळ्यांच्या दवाखान्यात डोळ्यांचा तपासणी (Eye Test) केला जातो, ज्या अंतर्गत: डिस्टन्स व्हिजन तपासले जाते..ऑटो-रेक्टोमीटर किंवा रेटिनोस्कोपी केली जाते..
إرسال تعليق