भारतातील सर्वात मोठ्या 'या' IT कंपनीत नोकरकपात , AI चा फटका
भारतातील सर्वात मोठ्या 'या' IT कंपनीत नोकरकपात , AI चा फटका
MH १ २ पुणे : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही भारतातील आणि जगातील एक प्रमुख माहिती तंत्रज्ञान (IT) सेवा कंपनी आहे.टीसीएस (Tata Consultancy Services) ही भारतातील आणि जगातील एक अग्रगण्य माहिती तंत्रज्ञान सेवा कंपनी आहे. कंपनीने नुकतीच काही महत्त्वाची आर्थिक आणि कर्मचारी संबंधित घोषणाही केली आहे.ही टाटा समूहाची एक कंपनी असून, 1995 मध्ये स्थापन झाली.TCS ही भारतातील सर्वात मोठी IT सेवा कंपनी आहे.जागतिक स्तरावरही TCS ही टॉप IT कंपन्यांमध्ये येते.
ही कंपनी बँकिंग, वित्त, आरोग्य, दूरसंचार, उत्पादन, आणि इतर उद्योगांसाठी सेवा पुरवते. सॉफ्टवेअर सेवा, IT सोल्यूशन्स, व्यवसाय सल्ला, क्लाउड सेवा, डिजिटल तंत्रज्ञान, कन्सल्टिंग.. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे जागतिक स्तरावर ५०० पेक्षा जास्त कंपन्या आहेत .लाखो लोक (जगभरातील सर्वाधिक IT कर्मचारी असलेली कंपनी) या कंपनीत काम करत असतात .कंपनीने स्पष्ट केले आहे की ती 2026 या आर्थिक वर्षात (एप्रिल 2025 ते मार्च 2026) त्यांच्या कंपनी तील 2026 आर्थिक वर्षात 2% कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे सुमारे 12,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवर परिणाम होईल.याचा विपरीत परिणाम या कंपातीत काम करणाऱ्या सुमारे १ २ ० ० पेक्षा कामगारावर होणार आहे .कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि तंत्रज्ञानातील बदलांमुळे नोकर कपातीचा निर्णय :
टीसीएसचे सीईओ के. कृतिवासन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, आपण नवीन तंत्रज्ञानाकडे, विशेषतः एआय आणि ऑपरेटिंग मॉडेलमध्ये बदलांकडे वाटचाल करत आहोत. यामुळे काम करण्याची पद्धत बदलत आहे आणि आपल्याला स्वतःला अधिक चपळ आणि भविष्यासाठी तयार बनवावे लागेल. त्यांनी हे देखील मान्य केले की कंपनीने कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढवण्याचा आणि त्यांना पुन्हा नियुक्त करण्याचा प्रयत्न केला. परंतू, काही भूमिका अशा होत्या जिथे हे शक्य नव्हते. म्हणून, ही टाळेबंदी आवश्यक झाली. त्यांच्या मते, हा निर्णय प्रामुख्याने मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांवर परिणाम करेल. सीईओंनी याला "माझ्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात कठीण निर्णय" म्हटले आहे.
इतर पोस्ट्स वाचण्यासाठी येथे क्लिक करा : सरकारी नोकरी | केंद्रीय गुप्तचर विभागामध्ये 3717 पदांची भरती
काय आहे नवीन धोरण ..?
टीसीएसने अलीकडेच लागू केलेल्या नवीन बेंच धोरणामुळे कर्मचाऱ्यांसाठी तणाव निर्माण झाला आहे. 12 जून 2025 पासून लागू होणाऱ्या या धोरणानुसार, कोणत्याही कर्मचाऱ्याला एका वर्षात 225 बिल करण्यायोग्य दिवस पूर्ण करावे लागतील. म्हणजेच, कंपनीला थेट महसूल देणाऱ्या प्रकल्पावर त्यांना एका वर्षात किमान इतके दिवस काम करावे लागेल. याशिवाय, बेंचवर राहण्याचा (म्हणजे प्रकल्पाबाहेर राहण्याचा) कालावधी आता फक्त 35 दिवसांपर्यंत मर्यादित करण्यात आला आहे. पूर्वी हा कालावधी खूप जास्त होता. या धोरणामुळे हजारो कर्मचाऱ्यांनाही त्रास होण्याची शक्यता आहे, विशेषतः जे नवीन प्रकल्प मिळेपर्यंत बेंचवर राहतात.
भारतीय कर्मचाऱ्यांवरही काय परिणाम होऊ शकतो ?
कंपनीने भारतातील किती कर्मचाऱ्यांना या कपातीचा फटका बसेल हे सांगितले नसले तरी, भारत हा TCS चा सर्वात मोठा कर्मचारी वर्ग असल्याने, त्याचा परिणाम येथेही नक्कीच दिसून येईल असे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच, मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील ही कपात कंपनीत दीर्घकाळ काम करणाऱ्या अनुभवी व्यावसायिकांसाठी चिंतेचे कारण असू शकते.
إرسال تعليق