आणि पायलटने विमानाचे थेट नदीतच लँडिंग केले...! । हडसन नदीवरील चमत्कार । The Miracle On The Hudson river..!
![]() |
आणि पायलटने विमानाचे थेट नदीतच लँडिंग केले...! । हडसन नदीवरील चमत्कार । The Miracle On The Hudson river..! |
प्रत्येक विमान अपघाताची कथा एकसारखी नसते.विमान दुर्घटना हि वेगवेगळ्या कारणांनी होत असते .कधी मानवी चुकातर,तर कधी तांत्रिक बिघाड तर कधी कधी हवामानाची परिस्थिती आणि संरक्षण प्रणालीतील समस्या... विमानामध्ये अपघात होऊ नये यासाठी खूप काळजी घेतली जाते ,परंतु तरीही काही विमान अपघात होतंच असतात .त्यातीलच ही एक घटना आहे १५ जानेवारी २००९ ची. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील लागार्डिया विमानतळावरून उड्डाण केलेली यूएस एअरवेज फ्लाइट १५४९ नॉर्थ कॅरोलिनाच्या शार्लोट शहराकडे जात होती. हे एक एअरबस A-320 विमान होते. दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी या विमानाने लागार्डिया विमानतळावरून उड्डाण केले. विमानात १५० प्रवासी आणि ५ क्रू मेंबर्स होते. कॅप्टन चेस्ली सलेनबर्गर विमान चालवत होते.
विमानाने टेकऑफ केल्यानंतर अवघ्या दोन मिनिटांतच विमान एका भल्यामोठ्या कॅनडियन गीज पक्ष्यांच्या थव्याशी धडकले. या धडकेमुळे दोन्ही इंजिन्स खराब झाली आणि विमानाला थ्रस्ट मिळणे थांबले. कॅप्टनने इंजिन्स रीस्टार्ट करण्याचे अनेक प्रयत्न केले...., पण ते अपयशी ठरले.आणि मग त्यांनी लागार्डिया कंट्रोल टॉवरला सांगितले की ते विमान परत विमानतळावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
पण लवकरच सलेनबर्गरला कळून चुकले की विमान जितक्या वेगाने खाली येत आहे, त्यावरून लागार्डिया विमानतळापर्यंत पोहचणे अशक्य आहे. त्यांनी न्यू जर्सीतील एका विमानतळावर लँडिंग करण्याचा विचार केला, पण ते ही शक्य वाटत नव्हते. शेवटी कॅप्टन सलेनबर्गरने कठोर निर्णय घेतला.... आणि ती वेळच... तसा निर्णय घेण्याची होती. त्यांनी आपला निर्णय कंट्रोल टॉवरला सांगितला आणि सर्वच थक्क झाले...!
Related posts: कर्नाटकात आहे १ वैशिष्ट्य पूर्ण दगड, जाणून घ्या नक्की काय आहे ...?!
कॅप्टन सलेनबर्गरने ठरवले की विमान थेट हडसन नदीत लँड करायचे...! हा खूपच धाडसी आणि धोकादायक निर्णय होता. विमानातील प्रवाशांची अवस्था तर खूप बिकट होती. अनेकांनी आपला मृत्यू निश्चित मानला होता, तर काही देवाकडे प्रार्थना करत होते. आणि बरोब्बर ... ३ वाजून २९ मिनिटांनी प्रवाशांना इंटरकॉमवरून पायलटचा आवाज ऐकू आला —
“दिस इज द कॅप्टन. ब्रेस फॉर द इम्पॅक्ट.”
And A Miracle On Hudson..!
हे ऐकून प्रवासी घाबरून ओरडू लागले. काही वेळाने विमान नदीला भिडले... धडक तर खूप जबरदस्त होती... विमानाच्या तळाला तडे गेले आणि त्याच्यातून पाणी विमानात शिरु लागले... पण सुदैवाने फ्युएल टँक पूर्ण भरलेले नसल्यामुळे विमान नदीवर अलगदपणे सरळ राहिले. विमान थांबताच लोक बाहेर आले, काही लोक पंखांवर उभे राहिले..., तर काही जण राफ्ट्समध्ये गेले. काही मिनिटांतच मदत आली आणि सर्व लोकांना सुरक्षित वाचवण्यात आले. पाणी अतिशय थंड असल्यामुळे अनेकांना हायपोथर्मियाचे उपचार घ्यावे लागले. पाच जण गंभीर जखमी झाले, पण कुणाचाही मृत्यू झाला नाही.हे हडसन नदीवरील एक चमत्कार म्हणून ओळखले जाते ,या घटनेमुळे पायलट कॅप्टन सलेनबर्गर नायक ठरले आणि त्यांचे खूप कौतुक झाले .
![]() |
हडसन नदी |
काही लोकांनी त्यांच्या निर्णयावर टीका केली की नदीत विमान उतरवणे खूप धोकादायक होते, नशिब बलवत्तर होते म्हणून काही झाले नाही. पण बहुतेकांनी त्यांचे समर्थनच केले. नंतर अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डने या घटनेची चौकशी केली आणि कॅप्टन सलेनबर्गरचा निर्णय योग्य होता....! असे घोषित केले.
![]() |
कॅरोलिनाज एव्हिएशन म्युझियम |
नंतर काही दिवसांनी त्या विमानाला नदीतून बाहेर काढले गेले आणि २०११ मध्ये शार्लोट येथील कॅरोलिनाज एव्हिएशन म्युझियममध्ये ते प्रदर्शनासाठी ठेवले गेले. २०१६ मध्ये या घटनेवर “सली: मिरॅकल ऑन द हडसन” ही फिल्म आली. टॉम हँक्स यांनी कॅप्टन सलेनबर्गरची भूमिका साकारली होती आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता क्लिंट ईस्टवुड यांनी ती फिल्म दिग्दर्शित केली होती.
إرسال تعليق