नैसर्गिक आपत्तीमुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास भरपाईसाठी काय करावे..?
मागील काही वर्षात हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे वादळी वारा व वीजांसह मोठा पाऊस तसेच अचानक येणारा महापूर ई घटना घडत आहे. यात शेतकरी तसेच जनावरे यांचे वीज पडून, महापुराच्या पाण्यात तसेच विजेचा शॉक लागून जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढले आहे.तर आजच्या MH bara या ब्लॉग वर नैसर्गिक आपत्तीमुळे जनावरांचे नुकसान झाल्यास काय करावे याबद्दल माहिती ..
वीज पडून दगावलेल्या जनावरांसाठी नैसर्गिक आपत्तीमधून मदत उपलब्ध आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जनावरांचे नुकसान झाल्यास, अल्प आणि अत्यल्पभूधारक तसेच भूमिहीन पशुपालकांना शासनाच्या नियमांनुसार मदत दिली जाते.
जनावरांना टॅगिंगदरे ओळख देणे हा पशुधन व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, परंतु महाराष्ट्रात अजूनही बरेचसे पशुपालक टॅगिंग करण्याकडे लक्ष देत नाहीत . यामुळे बरेच नुकसान होते. आपल्याकडे असलेल्या सर्व जनावरांचे ऑनलाईन टॅगिंग करणे केल्यास आपल्या जनावरांना एक ओळख मिळते. वासरे किंवा करडे जन्माला नंतर एक महिन्यांमध्ये टॅग इन करून घेणे आवश्यक असते. त्यामुळे जनावर च्या नोंदी ठेवणे सरकारला मदत होते.
त्यासाठी जनावर दगावले असल्यास तलाठी यांचा पंचनामा तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांचा पोस्टमार्टम अहवाल सादर करणे आवश्यक आहे.
अशी मिळणार मदत
१) दुधाळ जनावरे म्हैस, गाय, ३०,००० रुपये.मेंढी, बकरी - ३,००० रुपये.
२) ओढकाम करणारी जनावरे बैल - २५,००० रुपये.वासरू, शिंगरू, खेचर - १६,००० रुपये.
मदतीचे स्वरूप कसे ठरवले जाते ?
पशुवैद्यकीय अधिकारी हे घटनास्थळी येऊन मृत जनावराची अंदाजे रक्कम ठरवतात. त्यांनी ठरवलेल्या रकमेच्या 50% रक्कम शेतकऱ्यांना मदत म्हणून दिली जाते. घटना घडल्यापासून 24 तासाच्या आत मध्ये ही रक्कम शेतकऱ्यास देणे अपेक्षित असते, मात्र याला सहा सहा महिने किंवा कित्येक वर्ष सुद्धा लागतात .. जास्त कालावधी आणि भरपाई ची अनिश्चितता यामुळे शेतकरी ही नाईलाजाने या किचकट प्रक्रियेकडे पाठ फिरवत आहेत..
जनावरांची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला जवळच्या सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क करावा लागेल. शेळ्यांसाठी लहान टॅग आणि गाय, बैल आणि म्हैस यांच्यासाठी मोठे टॅग उपलब्ध असतात. जवळच्या पशुवैद्यकीय अधिकारी यांना तोंडी माहिती द्यावी लागेल.
जनावराची ऑनलाइन नोंदणी हवीच..!
◼️ जनावरांना ऑनलाइन टॅगिंगद्वारे ओळख देणे हा व्यवस्थापनाचा महत्त्वाचा भाग आहे; परंतु अजूनही बरेच पशुपालक टॅगिंग करण्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे बऱ्याच वेळा नुकसान होते.
◼️ आपल्याकडील सर्व पशुधनाचे टॅगिंग करावे. वासरे/करडे जन्मल्यानंतर एक महिन्यामध्ये टॅगिंग करणे आवश्यक आहे.
◼️ टॅगिंग केल्यामुळे आपल्या जनावरांना एक ओळख मिळते.
◼️ आपल्या गोठ्यातील एखादे जनावर दगावल्यास टॅगिंग असेल तर सरकारकडून आर्थिक मदत मिळवणे, विमा रक्कम मिळवणे किंवा काही सवलती मिळविण्यास मदत होते.
∎ महाराष्ट्र सरकारने राज्यातील दूध उत्पादक पशुपालकांना गाईच्या दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे, याचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांना त्यांच्या गाईचे टॅगिंग करून त्यांचे ऑनलाईन नोंदणी भारत पशुधन पोर्टलवर करणे आवश्यक आहे.
∎ जनावरांचे कायदेशीर वाहतूक करताना अडथळा येत नाही.
∎ त्वचे चे आजार जसे की लंपी सारख्या आजार किंवा इतर संसर्गजन्य रोगामुळे जनावर दगावल्यास नुकसान भरपाई मिळण्यास मदत होते.
टॅगिंग करताना काय काळजी घ्याल..?
१) कानाच्या शिरेवर शिरेवर टॅग मारला जाणार नाही याची काळजी घ्यावी.
२) टॅग मारताना पटकन टॅग मारावा जास्त विलंब केल्यास ईजा होण्याची शक्यता असते.
३) टॅगिंग करताना जनावर व्यवस्थित पकडून ठेवावे जेणेकरून ते जास्त धडपड करणार नाहीत.
४) कानाला जर पूर्वीचे छिद्र असेल तर त्यामध्ये टॅग बसवता येतो.
इतर posts वाचण्यासाठी येथे क्लिक करा: Ranbhajya In Marathi | रानभाज्यांचे आयुर्वेदिक महत्व | पावसाळ्यातील रानभाज्या आरोग्यास बहुगुणी
إرسال تعليق