Petrol Pump | पेट्रोल पंपातून होतेय लाखोंची कमाई! जाणून घ्या काय आहे प्रक्रिया..?
![]() |
Petrol Pump |
भारतात दोन चाकी चार चाकी तसेच इतर मालवाहू गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत झाले आहे. वाढत चाललेल्या वाहनांना पेट्रोल आणि डिझेलची मागणी सुद्धा वाढत आहे. भारतात गाड्यांची संख्या खूप आहे त्यामानाने पेट्रोल पंपाची संख्या कमी आहेत. शहरांपासून ते ग्रामीण भागापर्यंत पेट्रोल पंप चालवून पेट्रोल पंप मालक चांगले कमाई करत आहेत..
पण पेट्रोल पंप सुरू करणे हे काही सोपे काम नाही त्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक, विविध परवानगी आणि खूप वेळ लागतो.तर आजच्या MH 12 या ब्लॉग वर आपण पेट्रोल कसा सुरू करू शकतो तसेच काही कायदेशीर प्रक्रिया समजून घेऊ....
साधारणपणे पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक भांडवल असणे फार गरजेचे असते. ग्रामीण भागात जर पेट्रोल पंप व्यवसाय सुरू करायचा असेल तर किमान 20 लाख रुपयांची गुतवणूक आवश्यक असते तर शहरांमध्ये हा खर्च 50 लाख पर्यंत जाऊ शकतो.. यामध्ये विविध परवानगी, पंपासाठी मोठे जमिनीखाली टाकी, डिस्पेन्सर तसेच पायाभूत सुविधांचा समावेश होतो. पेट्रोल पंप टाकण्यासाठी जर जमीन स्वतःची असेल तर उत्तम होते. पण जर जमीन विकत घेऊन पंप करायचा सुरू करायचा असल्यास गुंतवणूक वर परिणाम होतो..
अर्ज कोण कोण करू शकतात ?
पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी अर्जदार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
अर्जदार व्यक्तीचे वय 21 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे.
स्वतःची जमीन किंवा भाडेपट्टीवरील जमीन असणे बंधनकारक आहे.
अंदाजे किती जागा लागेल ?
ग्रामीण भागात 1200 ते 1600 चौरस मीटर तर शहरांमध्ये 800 ते 1200 चौरस मीटर जागा असणे आवश्यक असते. पेट्रोल पंपाचा व्यवसाय अधिक परिणामकारक होण्यासाठी पंप शक्यतो मुख्य रस्त्यावर, जास्त वाहतूक तसेच वर्दळीच्या भागात किंवा मोठ्या चौकात असावी.
परवाना कुठून मिळतो ?
पेट्रोल पंप करण्यासाठी परवाना हा अत्यंत आवश्यक बाब असते. पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी ऑइल मार्केटिंग कंपनी (OMC) कडून डीलरशिप घ्यावे लागते. इंडियन ऑइल (IOC) ,भारत पेट्रोलियम(BPCL) ,हिंदुस्तान पेट्रोलियम(HP) ,रिलायन्स पेट्रोलियम इत्यादी यासारख्या कंपन्या आपल्या वेबसाईटवर अर्ज प्रक्रिया जाहीर करत असतात. अधिक माहितीसाठी या वेबसाईटवर माहिती उपलब्ध आहे..
⛽ पेट्रोल पंप नोंदणीसाठी अधिकृत वेबसाइट्स
📌 मुख्य अर्ज पोर्टल:
👉 https://www.petrolpumpdealerchayan.in
ही सर्वाधिक महत्त्वाची वेबसाइट आहे जिथे नवीन पेट्रोल पंपसाठी जाहिरात आणि अर्ज प्रक्रिया चालते.
कोणती कागदपत्रे आवश्यक असतात?
पेट्रोल पंपासाठी अर्ज करताना खालील प्रमाणे कागदपत्रांची आवश्यकता असते.. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक स्टेटमेंट,जागा, जन्मतारीख प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे अपलोड करावी लागतात. अर्जदार जर जास्त असतील तर लॉटरी पद्धतीने किंवा बोली पद्धतीने निवड केली जाते.
पेट्रोल पंप बांधण्याची परवानगी मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासन, अग्निशमन यंत्रणा विभाग तसेच नगरपालिका असेल किंवा ग्रामपंचायत असेल तर त्यांच्याकडून मंजुरी घेऊन बांधकाम करावे लागते .यासाठी सरासरी वेळ सहा ते बारा महिने लागतात . पेट्रोल पंप चालवण्यासाठी कमीत कमी सहा ते दहा कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते..
इतर posts वाचण्यासाठी येथे क्लिक करा: एक लिटर पेट्रोल आणि डिझेल मागे पंप चालक किती कमाई करतात...?
सूचना:
या ब्लॉगवरील सर्व माहिती फक्त सामान्य ज्ञानावर आधारित देण्यात आलेली आहे. येथे दिलेल्या माहितीचा योग्य शहानिशा करून घ्यावी. वाचकांनी कोणताही निर्णय घेताना तज्ञांचा सल्ला घ्यावा.
إرسال تعليق